मनुक्याच्या पाण्यामध्ये अनेक पोषण तत्वे असतात. तसेच यामध्ये अनेक खनिज तत्वांचा समावेश असतो. यामध्ये पोटॅशियम,कॅल्शियम आणि फायबर यांसारखी घटक आढळतात. मनुक्याचं पाणी शरीरासाठी फायदेशीर ठरु शकतं. सर्व प्रकराच्या आजरांपासून दूर ठेवण्यासाठी मनुक्याचं पाणी उपयुक्त ठरु शकते. त्वचेसाठी देखील हे फायदेशी ठरु शकतं. पोटाच्या आजारापासून दूर राहण्यास देखील मदत होऊ शकते. वजन कमी करण्यास मनुक्यांचं पाणी मदत करते. केसाच्या पोषणासाठी मनुक्यांचं पाणी पिणं फायदेशीर ठरु शकतं.