भारतीय मसाले केवळ जेवणाची चव वाढवण्यासोबतच अनेक रोगांवरही गुणकारी आहेत.



मसाले आणि त्यांचे औषधी फायदे जाणून घ्या.

मसाले आणि त्यांचे औषधी फायदे जाणून घ्या.

भारतीय मसाल्याचं अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे अनेक आजारांपासून सुटका होते.



हळदीमध्ये कर्क्युमिन हे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी संयुग आढळतं. संशोधनानुसार, कर्क्युमिन संधिवात, हृदयरोग आणि काही कर्करोग यांसारख्या जुनाट रोगांवर मात करण्यास मदत करू शकते.



दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. याचे सेवन मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या व्यक्तींसाठी ते फायदेशीर ठरते.



दालचिनी शरीरावरील सूज कमी करण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास सुधारण्यासाठी फायदेशीर आहे



वेलची त्याच्या एक वैशिष्ट्यपूर्ण सुगंध आणि चव यासाठी ओळखली जाते. पण याचे औषधी गुणधर्मही आहेत. वेलची पचनास मदत करण्यासाठी आणि पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी पारंपारिक उपाय आहे.



संशोधनाममध्ये याचे आरोग्यदायी फायदे समोर आलं आहेत. वेलचीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. यामध्ये कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात.



पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. इतकंच नाही तर, यामुळे हृदयाचे आजारही टाळता येतात.