काही घरगुती उपाय करुन दात स्वच्छ करु शकता. कडुलिंबाच्या पावडरने दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. कडुलिंबाच्या पावडरमध्ये अनेक गुण असतात. यामुळे दातांचा वास न येण्यास मदत होते. बेकिंग सोडा देखील दात स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा लिंबाचे साल दातांवर घासावे. त्यामुळे दात पांढरे होण्यास मदत होते. राईचे तेल देखील दात स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरु शकते. राईच्या तेलामध्ये मीठ घालून रोज दात स्वच्छ करावेत. त्यामुळे हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.