मोबाईल हा आजच्या काळात लोकांची गरज बनला आहे. अनेक लोकं सकाळी उठल्यावर सर्वात आधी मोबाईल पाहतात. पण सकाळी उठल्यावर मोबाईल पाहणे ही सवय शरीरासाठी हानीकारक ठरु शकते. सकाळी उठल्यावर मोबाईल पाहिल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया सकाळी मोबाईल पाहिल्याने कोणत्या समस्या होतील. सकाळी उठल्यावर मोबाईल पाहिल्याने तुमचा ताण वाढू शकतो. तसेच तुमची काम करण्याची गती देखील मंदावू शकते. मानसिक आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. झोपेवरही परिणाम होऊ शकतो. डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.