पेरु खाण्याचे अनेक फायदे आहेत. पेरुमध्ये जीवनसत्त्व b3 आणि जीवनसत्त्व b6 असते. रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारण्यास देखील मदत होते. नसांना देखील आराम मिळण्यास मदत होते. पेरुमध्ये कॉपरचे प्रमाणही असते. त्यामुळे शरीराला अनेक फायदे होण्यास मदत होते. अपचनाची समस्या दूर करण्यास पेरु फायदेशीर ठरु शकते. त्वचेवरील डांगासाठी देखील पेरु खाणे फायद्याचे ठरु शकते. मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी पेरु फायदेशीर आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण देखील असते.