केळं खाणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. यामध्ये अनेक पोषण तत्वांचा देखील समावेश असतो. हे खाल्ल्याने लगेचच एनर्जी मिळते. पण तुम्हाला माहितेय का की रात्रीच्या वेळी केळं का खाऊ नये? झोपण्याआधी केळं खाल्ल्याने म्यूकसचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. तसेच रात्रीच्या वेळी केळं खाल्ल्याने सर्दी होण्याची देखील शक्यता जास्त असते. रात्रीच्या वेळी मेटाबॉलिजमचे प्रमाण कमी होते. तसेच रात्रीच्या वेळी केळं खाल्ल्यास लठ्ठपणा येण्याची शक्यता असते. केळं पचण्यास खूप वेळ लागतो. केळं खाल्ल्यानंतर सुस्ती देखील येते.