मक्याच्या पीठात बीटा-कॅरटीन नावाचं तत्त्वं आढळतं. हे तत्त्व रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीत मदत करतं. त्यामुळे हे खाल्ल्याने एनिमियाचा त्रास होत नाही.



मक्याचे फायदे अधिक असल्यामुळे वजन वाढवण्यासाठी मैद्याच्या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.



मण्याचं कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांसाठी आणि खासकरुन वृद्धांसाठी मक्याचं कणीस फायदेशीर आहे.



मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे उकळत्या पाण्यात हळद आणि मीठ घालून मक्याचे दाणी उकडून खाल्ल्यास त्याचाही शरीराला फायदा होतो.



मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते.



याव्यतिरिक्त मक्यात झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते. आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिस यापासून संरक्षण होते.



मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.



मका तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे तुमची दृष्टी सुधारते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.