मुल्तानी माती ही त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. यामुळे अनेक प्रकारच्या त्वचेच्या रोगांशी सामना करण्यास मदत होऊ शकते. जसे की डाग, तेलकट त्वचा यांसाठी मुल्तानी माती फायदेशीर ठरु शकते. याचा वापर तुम्ही गुलाब पाण्यासोबत करु शकता. त्यासाठी हा पॅक तुम्ही 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर लावा. तेलकट त्वचेसाठी मुल्तानी माती दह्यात मिसळून चेहऱ्यावर लावा. मुल्तानी माती आणि दह्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचा एक्सफोलिएट होते. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. चंदनाची पावडर देखील त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकते. चंदनाच्या पावडरमध्ये तुम्ही मुल्तानी माती मिसळून चेहऱ्यावर लावू शकता.