इस्रो लवकच आदित्य एल1 हे मिशन लाँच करणार आहे. तसेच हे मिशन दोन सप्टेंबर रोज लाँच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सूर्य हा सूर्यमालेतील सर्वात मोठा तारा आहे. पृथ्वीवर सूर्य रोज पाहायला मिळतो. पण पृथ्वीवरुन सूर्य फारच लहान दिसतो. खरंतर सूर्य हा पृथ्वीपेक्षा खूप मोठा आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर हे जवळपास 15 कोटी किलोमीटर इतके आहे. सूर्य हा पृथ्वीच्या जवळपास 109 टक्क्यांनी मोठा आहे. सूर्याचा व्यास हा 13 लाख 90 हजार किलोमीटर इतका आहे. सूर्य हा दिसतांना जरी एखाद्या ग्रहासारखा दिसत असला तरी तो एक तारा आहे.