अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) आज 30 वा वाढदिवस आहे.



आलिया तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



गंगूबाई काठियावाडीमधील गंगू ते हायवेमधील वीरा, आलियाच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



आलियाचा जन्म 15 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये झाला.



आज आलियाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल



आलियाने वयाच्या सहाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिने 1999 मध्ये रिलीज झालेल्या संघर्ष चित्रपटात प्रीती झिंटाच्या बालपणीची भूमिका साकारली होती.



2012 मध्ये रिलीज झालेल्या स्टुडंट ऑफ द इयरमध्ये आलियाने प्रथमच मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली.



आलियानं डार्लिंग्स, हायवे, 2 स्टेट्स आणि हम्टी शर्मा की दुल्हनिया यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली.



गंगूबाई काठियावाडीमधील आलियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.



आलियाच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



Thanks for Reading. UP NEXT

जाणून घ्या आमिर खानच्या हिट चित्रपटांबद्दल

View next story