'इंडियन आयडॉल 13'चा विजेता ऋषी सिंह ठरला आहे. ऋषी सिंहला 'इंडियन आयडॉल 13'च्या ट्रॉफीसह 25 लाख रुपये आणि मारुती सुझुकी एसयूव्ही ही कार बक्षीस म्हणून मिळाली आहे. तसेच ऋषीला सोनी म्युझिक इंडियाबरोबर रेकॉर्डिंगचा कॉन्टॅक्टदेखील मिळाला आहे. ऋषी सिंह 'इंडियन आयडॉल 13'चा विजेता झाल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. अयोध्येचा लोकप्रिय गायक ऋषी सिंह आज देशभरातील संगीतप्रेमींचा लाडका बनला आहे. ऋषी सिंह 'इंडियन आयडॉल 13'मध्ये सहभागी होण्याआधी मंदिरांमध्ये आणि गुरुद्वारामध्ये गाणं गात असे. 'इंडियन आयडॉल 13'चा विजेता झाल्यानंतर ऋषी म्हणाला,इंडियन आयडॉल 13' चा मी विजेता झालो आहे यावर माझा विश्वास बसत नाही. हे सगळं मला स्वप्नवत वाटत आहे. 'इंडियन आयडॉल 13'मुळे ऋषी सिंहची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. ऋषी अयोध्येचा असून सध्या तो डेहराडूनमधील हिमगिरी या विद्यापीठात शिक्षण घेत आहे. 'इंडियन आयडॉल 13'चा विजेता झाल्यानंतर ऋषी सिंहने पुन्हा या मंचावर परीक्षक म्हणून यायची इच्छा व्यक्त केली आहे.