'अवतार द वे ऑफ वॉटर' या हॉलिवूड सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे.

'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाचा आता जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत समावेश झाला आहे.

'अवतार 2'ने हॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे.

'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.075 बिलियन डॉलरची कमाई केली आहे.

'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाचं दिग्दर्शन जेम्स कॅमेरॉनने केलं आहे.

'अवतार 2' या सिनेमाने फक्त भारतात तब्बल 390 कोटींचा गल्ला जमवला आहे.

'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे.

'अवतार 2' लवकरच डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो.

'अवतार 2' या सिनेमाच्या पुढच्या भागाची चाहते प्रतीक्षा करत आहेत.