बॉलिवूड अभिनेता सोनू सूद खऱ्या अर्थाने हिरो आहे.

खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदचा मोठा चाहतावर्ग आहे.

कोरोना काळात अभिनेता सोनू सुदने सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

सोनू सूदच्या कार्याला सोलापूरच्या चित्रकार विपूल मिरजकरची तिरंगा रांगोळी काढून सलामी दिली आहे.

सोलापूरातील सोनू सूदच्या एका चाहत्याने तब्बल 87 हजार स्क्वेअर फुटांमध्ये ही रांगोळी खास अभिनेत्यासाठी काढली आहे.

श्रीपाद मिरजकर असे या रांगोळी काढणाऱ्या कलाकाराचे नाव आहे.

सोनू सूदने रांगोळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोनूने व्हीडिओ शेअर करत लिहिलं आहे,माझ्याकडे खरचं शब्द नाहीत. चाहत्यांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. 87,000 स्क्वेअर फुटांची रांगोळी काढण्याऱ्या कलाकाराचे आभार... मला त्याचा खूप अभिमान आहे.

सोनू सूदने कोरोनाकाळात अनेक गरजूंना मदत केली आहे.

सोनू सूदचा 'फतेह' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.