बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी काल म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्पॉट झाली होती. यावेळी कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसले. कियाराच्या एका महागड्या बॅगने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आज देखील कियाराचा नवा लूक व्हायरल झालाय. व्हाईट आउटफिटमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत आहे. कियाराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सटा वर्षाव केलाय. सिद्धार्थ आणि कियारा 'शेरशाह' चित्रपटात एकत्र दिसले होते. शेरशाहपासूनच त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. दोघंही आपलं नातं मीडियाच्या नजरेतून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. दोघांचे प्रेम मीडियाच्या नजरेतून सुटत नाही.