आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या अविनाश साबळेला गावकरी डोक्यावर घेऊन नाचले. आष्टी तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी असलेला ऑलिम्पिक खेळाडू अविनाश मुकुंद साबळे याने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले. तो सुवर्णपदक पटकावल्यानंतर पहिल्यांदाच गावात आल्यावर त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. देशाची मान उंचावणाऱ्या अविनाशला ग्रामस्थ अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचले. चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 3 हजार मिटर स्टीपलचेस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणि 5 हजार मीटर स्पर्धेमध्ये रौप्य पदक अविनाश साबळेने जिंकले. यामुळे भारत देशाचे नाव उंचावले. तो आष्टी तालुक्यातील मांडवा येथे आपल्या गावी आला. यावेळी ग्रामस्थांनी त्याची वाजत गाजत, फुलांची उधळण करत गावभर मिरवणूक काढली. अनेकांनी त्याला डोक्यावर घेत घोषणाबाजी केली. यावेळी अविनाश म्हणाला, ऑलिम्पिकचे एक काय अनेक पदके आपल्या देशाला मिळू शकतात. या स्पर्धेत विजय मिळाळ्यामुळे आता जबाबदारी वाढणार आहे. सर्व ग्रामस्थांन समोर नतमस्तक होऊन अविनाश साबळे यांनी सर्वाचे दर्शन घेतले.