शारदीय नवरात्रीत देवी दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.

नवरात्रीत लोक नऊ दिवस उपवास करतात. या काळात देवीची भक्तीभावाने सेवा केली जाते.

पण, याच काळात अनेकदा आपल्याकडून चुकून उपवास मोडला जातो.

अशा वेळी नेमकं काय करायचं ते जाणून घेऊयात.

चूक झाली आणि नकळत नवरात्रीचा उपवास मोडला असल्यास तुम्ही काळजी करू नका.

यासाठी सर्वात आधी देवीसमोर हात जोडून माफी मागा.

जर चुकून व्रत मोडलं, तर आईच्या नावाचं हवन केल्याने दोष दूर होतील.

नवरात्रीत ज्या दिवशी तुमचा उपवास सुटेल, त्या दिवशी देवीच्या स्वरूपाच्या देवीची क्षमा मागा.

आणि त्याच देवीच्या नावाच्या मंत्राचा जप करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)