22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होतेय.
या दरम्यान पहिल्या दिवशी बहुतेक लोक घरात अखंड ज्योत लावतात.


असं म्हणतात की, ज्या घरात 9 दिवस अखंड ज्योत पेटते त्या ठिकाणी देवीचा वास असतो.



वास्तूशास्त्रानुसार, अखंड ज्योतीची ज्योत, रंग आणि दिशा यामधून अनेक प्रकारचे संकेत मिळतात, जे शुभ आणि अशुभ दोन्ही असतात.



असं म्हणतात की ,अखंड ज्योतीची ज्योत सोन्यासारख्या रंगाची असेल तर धन-धान्यत वाढ होण्याचे संकेत मिळतात.



अखंड ज्योतीची दिशा वारंवार पूर्व किंवा उत्तरेकडे जात असेल तर हा देवीच्या प्रसन्नतेचा संकेत मानला जातो.



असं म्हणतात की, यामुळे कुटुंबात सुख, समृद्धी येते, वादविवाद मिटतात.



नवरात्रीमध्ये अखंड ज्योत विझणं शुभ मानले जात नाही. हे कामात अडथळा येण्याचे संकेत आहे.



लक्षात ठेवा, एकदा अखंड ज्योत (दिवा) लावल्यानंतर त्याची वात सतत बदलू नका. एकाच वेळी मोठी वात लावा.