मनी प्लांट योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने लावावा.
मनी प्लांटबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत, ज्यांचं पालन केलं तरच त्याचा पुरेपूर फायदा होऊ शकतो.
मनी प्लांट चोरी करून लावावा असा उल्लेख वास्तुशास्त्रात नाही.
त्यामुळे नेहमी खरेदी केलेलाच मनी प्लांट लावा.
असं केल्याने तुम्हाला मनी प्लांट लावल्याचा पूर्ण लाभ मिळेल.
साहजिकच चोरी करणं हे कोणत्याही धर्मात चांगलं मानलं जात नाही.
मनी प्लांटचा संबंध पैसा आणि लक्ष्मीशी आहे.
मनी प्लांटच्या वेलीचा तुकडा इतरांना देता येईल का? तर शास्त्रानुसार असं करणं चुकीचं आहे.
नर्सरीतून मनी प्लांट विकत घ्या आणि घरीच लावा, तरच त्याचे फायदे मिळतील.
मनी प्लांट जमिनीत लावू नका, तो मातीच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यात लावा.