नवग्रहांमध्ये शनि हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो.
3 ऑक्टोबर रोजी शनि नक्षत्र बदलून राहूच्या नक्षत्र शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल.
शनीने शतभिषा नक्षत्रात प्रवेश केल्याने काही राशींना फायदा होईल.
या काळात कोणत्या राशींना अफाट लाभ होईल? जाणून घेऊया.
शनीने शतभिषा नक्षत्रात प्रवेश केल्यावर या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा होणार आहे.
या काळात परदेशात फिरण्याचं तुमचं स्वप्न असेल तर ते नक्कीच पूर्ण होऊ शकतं आणि तुमचं आरोग्यही या काळात चांगलं राहील.
शनीच्या नक्षत्र बदलामुळे धनु राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळेल आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
तुम्हाला नवीन नोकरीच्या अनेक संधीही मिळू शकतात आणि व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.
शनी राहूच्या नक्षत्रात आल्याने मेष राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.
नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा होईल. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही समाधानी दिसत असाल.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)