मेष रास (Aries)

आज तुमच्या कामाचा तुम्ही जास्त प्रचार करायला हवा. तरच, तुमचा व्यवसाय जोमाने पुढे नेता येईल.

वृषभ रास (Taurus)

आजच्या दिवशी असं कोणतंच काम करू नका ज्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते.

मिथुन रास (Gemini)

आज भावा-बहिणीबरोबर तुमचे चांगले सलोख्याचे संबंध राहतील. यावेळी चुकूनही चिडचिड करू नका.

कर्क रास (Cancer)

कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित लोकांना पगारवाढीबाबत आनंदाची बातमी मिळू शकते.

सिंह रास (Leo)

एमबीए आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी वेळेवर त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देतील, तरच ते त्यांचं भविष्य चांगले घडवू शकतात.

कन्या रास (Virgo)

तरुणांबद्दल सांगायचे तर, परीक्षेची तारीख अचानक जाहीर झाल्यामुळे तुमचं टेन्शन वाढेल.

तूळ रास (Libra)

जोडीदाराबरोबरचा तुमचा आजचा दिवस मस्त, मजेत आणि आनंदात जाणार आहे.

वृश्चिक रास (Scorpio)

आज कामाच्या ठिकाणी तुमची कामं वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्हाला भरपूर वेळ लागू शकतो.

धनु रास (Sagittarius)

आज कामाच्या ठिकाणी गरजेपेक्षा जास्त मदत घ्याल. त्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो.

मकर रास (Capricorn)

आज कामाच्या ठिकाणी तुमचा इतरांशी व्यवहार चांगला असणार आहे. तुमचा बॉस तुमच्या कामगिरीवर प्रसन्न असेल.

कुंभ (Aquarius)

तुमचा व्यवसाय चांगला चालेल. फक्त कोणाला पैसे देताना सावधानता बाळगावी.

मीन (Pisces)

घरातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करायला शिका. अन्यथा यावरून तुम्हाला बोलणी खावी लागू शकतात.