वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, घरी जेवण करताना कोणत्या नियमांचं पालन करावं, याविषयी जाणून घेऊया. वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जेवण करायला उत्तर आणि पूर्व दिशेला बसावं. शास्त्रानुसार, दक्षिण दिशेला जेवण करायला बसू नये, नाहीतर अनेक अडचणी वाढू शकतात. जेवण करताना पश्चिम दिशेला कधीच बसू नये. या दिशेला तोंड करुन कधीच बसू नये नाहीतर आर्थिक अडचणी वाढू शकतात. अंथरुणावर बसून कधीही जेवू नये. वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. असे केल्याने नकारात्मकता वाढते. वाढलेले ताट दुसऱ्याला देतांना ते दोन्ही हाताने पकडावे. यामुळे इतरांसोबतचे नाते घट्ट होते. वास्तुनूसार, तुटलेल्या किंवा घाणेरड्या भांड्यांमध्ये जेवू नये, यामुळे घरात दारिद्र्य वाढते. जेवताना भांडण आणि वाद-विवाद करू नये. यामुळे जेवलेले अन्न अंगी लागत नाही. तसेच अन्नपूर्णा देवी रूष्ठ होते. आंघोळ न करता कधीही जेवण करू नये. यामुळे आळस वाढतो आणि आजारांना आमंत्रण मिळते.