मेष (Aries)

आज आलेल्या संधीचा फायदा अवश्य घ्यावा. अतिभावना प्रधानता उपयोगाची ठरणार नाही.

वृषभ (Taurus)

कोणत्याही गोष्टीचा चटका मनावर पगडा बसल्यामुळे काही कामे अविचाराने होण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini)

तुमच्या मुडी स्वभावाचे दर्शन लोकांना होईल. परोपकार करण्याचे अनेक प्रसंग शोधून काढाल.

कर्क (Cancer)

वैवाहिक जीवनात तडजोडीचे वातावरण ठेवावे लागेल. विविध कला अवगत असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील.

सिंह (Leo)

महिलांना कुटुंबात तडजोड करावी लागेल. आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी आज तुम्ही सोडणार नाही.

कन्या (Virgo)

नोकरी-व्यवसायात कात टाकल्याप्रमाणे पुन्हा एक ओजस्वी व्यक्तिमत्व इतरांना तुमच्यात पाहायला मिळेल.

तूळ (Libra)

तुमच्या पुढे-मागे तुमचे चाहते घिरट्या घालतील. अशावेळी त्यांना बसायला पाट द्या, पण जेवणाचे ताट मात्र देऊ नका.

वृश्चिक (Scorpio)

घरामध्ये तुमच्या मतांना किंमत दिली जाईल. पूर्वीचे पेरले असेल ते उगवायला सुरुवात होईल.

धनु (Sagittarius)

प्रत्येक गोष्टीचा विचार पैशाच्या तराजूत तोलून तुम्ही करणार नाही. त्यामुळे तुम्हाला मिळणारे लाभ सुद्धा तुम्हाला मोलाचे वाटतील.

मकर (Capricorn)

काही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावे लागतील आणि त्यातून लाभ होतील.

कुंभ (Aquarius)

आज तुमच्या वागण्यात बिनधास्त पणा दिसेल. आत्मविश्वासाने काम कराल.

मीन (Pisces)

भाग्याची साथ मिळाल्यामुळे वाढलेली कामे होऊन जातील. वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागेल.