मेष (Aries)

आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करावा.

वृषभ (Taurus)

आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा.

मिथुन (Gemini)

तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका.

कर्क (Cancer)

आज पचायला हलकं अन्न खा, नाहीतर तुमचं पोट खराब होऊ शकतं

सिंह (Leo)

आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो.

कन्या (Virgo)

तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर आरोग्याची काळजी घ्या.

तूळ (Libra)

मानसिक आजारी रुग्णांनी डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं.

वृश्चिक (Scorpio)

किरकोळ आजार देखील गांभीर्याने घ्या आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

धनु (Sagittarius)

आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे.

मकर (Capricorn)

ग्रहांची स्थिती लक्षात घेता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी राहील, गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी.

कुंभ (Aquarius)

जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आज तुम्हाला खूप हलकं वाटेल.

मीन (Pisces)

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, जर तुम्ही रोज वाकून काम करत असाल तर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.