आजची कल्कि जयंती खास! महत्त्व, पूजा पद्धत जाणून घ्या..

Published by: जगदीश ढोले
Image Source: PINTEREST

शास्त्रांमध्ये, भगवान कल्कि यांना भगवान विष्णूचा 10 वा आणि शेवटचा अवतार म्हणून वर्णन केले आहे.

Image Source: PINTEREST

मान्यतेनुसार, कलियुगात जेव्हा पाप खूप वाढेल, तेव्हा पापींचा नाश, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी कल्कि अवतार घेतील.

Image Source: PINTEREST

दरवर्षी, श्रावण महिन्यात, शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी भगवान कल्कि जयंती साजरी केली जाते.

Image Source: PINTEREST

त्यानुसार आज 30 जुलै 2025 रोजी कल्कि जयंतीचा उत्सव बुधवारी साजरा केला जात आहे.

Image Source: PINTEREST

पूजा पद्धत

सकाळी अंघोळ करून पवित्र वस्त्र परिधान करा, भगवान विष्णू किंवा कल्कीची मूर्ती/चित्र पूजनासाठी ठेवून विधीपूर्वक पूजा करा.

Image Source: PINTEREST

जप व पाठ

ॐ श्रीं कल्किने नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा, विष्णुसहस्रनाम किंवा कल्कि स्तोत्राचे पठण करा.

Image Source: PINTEREST

उपाय

गरिबांना अन्नदान करा, तुळशीचे रोप लावा, पांढऱ्या घोड्याचे चित्र पूजल्याने पापनाश मिळतो.

Image Source: PINTEREST

शनि, राहू, केतूचा त्रास असलेल्या लोकांनी हे पूजन अवश्य करावे. धन अडथळे आणि ग्रहदोष दूर होतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: PINTEREST