हाती घ्याल ते तडीस न्याल, परंतु स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेही लक्षात ठेवावे लागेल
हाजीर तो वजीर या न्यायाने नवीन कामे नवीन संधी मिळतील, मित्रमंडळींसाठी पैसा खर्च कराल
कुटुंबामध्ये तुमच्या शब्दाला किंमत राहील, तुमच्यातील उत्साह आणि तडफदारपणा कामांमध्ये सुधारणा करण्यास उपयोगी पडेल
सत्ता आणि मान मिळण्याच्या गोष्टींचे आकर्षण राहील, कोणत्याही क्षेत्रात काम करीत असला तरी कामाचा उरक चांगला राहील
आर्थिक मान वाढेल, त्यामुळे मनावरचा ताणही कमी होईल महिला जरा जास्तच मानी बनतील
मर्दानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना उत्तम ग्रहमान आहे, संपत्तीच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगला दिवस
स्वतः करीत असलेल्या कामांमध्ये नवीन संशोधन करून त्या कामाचा फडशा पाडाल
तरुण वर्गाला आपल्या जोडीदार निवडण्यामध्ये यश मिळेल त्यामुळे खुश राहतील.
नोकरी व्यवसायात जे काम कराल त्यामध्ये लाभ मिळेल अनेक क्षेत्रात रस घ्यायला
हरहुन्नरी बनाल, त्यामुळे साहित्य संगीत आणि अन्य कोणत्याही कलेशी जवळीक साधाल
सरकारी अडलेली कामे आवश्यक करा, नोकरीमध्ये बदल घडवून आणण्याच्या योजना आखाल
वारा पाहून पाठ फिरवल्यास फायद्याचे ठरेल, नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी येतील.