वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 24 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजून 14 मिनिटांनी शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
ज्योतिष शास्त्रात, शुक्र ग्रहाला सौभाग्य, सुख-सुविधेचं प्रतीक मानलं जातं.
या दरम्यान कोणत्या राशींवर शुभ प्रभाव होणार आहे जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह कन्या राशीत संक्रमण केल्याने वृश्चिक राशीच्या लोकांवर याचा चांगला प्रभाव पडणार आहे. या दरम्यान शुक्र ग्रहाच्या कृपेने तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील.
या राशीच्या लोकांच्या रोजगारात चांगली प्रगती दिसून येईल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे.
तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. वडिलोत्पार्जित संपत्तीचा लाक्ष देखील तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.
या काळात सिंह राशीच्या लोकांना चांगला धनलाभ होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल.
आयुष्यात तुम्हाला अनेक क्षेत्रांत चांगले परिणाम मिळतील. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे अगदी सहजपणे पूर्ण होतील.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)