12 राशींचे आजचे आरोग्य कसे असणार!

Published by: विनीत वैद्य

मेष रास (Aries)

किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण तुम्ही या आजारांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आजार वाढू शकतात.

वृषभ रास (Taurus)

तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास होणार नाही.

मिथुन रास (Gemini)

बदलत्या वातावरणामुळे आरोग्याची काळजी घ्या, ज्यांना सांधेदूखीचा त्रास आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी .

कर्क रास (Cancer)

आज पचायला हलकं अन्न खा, नाहीतर तुमचं पोट खराब होऊ शकतं, त्यामुळे सहज पचणारं अन्न खावं.

सिंह रास (Leo)

आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो.

कन्या रास (Virgo)

शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींनी आरोग्याची विशेष काळजी घ्या.

तूळ रास (Libra)

आज तुमची प्रकृती ठीक राहील.

वृश्चिक रास (Scorpio)

कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही, तुम्ही तुमच्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.

धनु रास (Sagittarius)

तब्येतीची विशेष काळजी घ्या, अगदी थोडा त्रास झाला तर नक्कीच डॉक्टरकडे जा.

मकर रास (Capricorn)

आज आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी राहील गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी.

कुंभ रास (Aquarius)

जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आज तुम्हाला खूप हलकं वाटेल.

मीन रास (Pisces)

जर तुम्ही रोज वाकून काम करत असाल तर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)