एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये. अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो.
हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते.
हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला हात लावू नये, मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरीही.
झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये, कारण झोपलेली व्यक्ती मृतवत दिसते आणि आणि आपण मृत व्यक्तीच्याच पाया पडतो.
आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये. कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो.
साधू-संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात.
जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिव शंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती.
भाच्याने मामाच्या पाया पडू नये, हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता.