मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ्र वस्त्र परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा.

Image Source: pexels

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावं, असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

Image Source: pexels

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिव तांडव स्तोत्राचं पठण करावं.

Image Source: pexels

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनी तांदळाचे 108 दाणे मोजावेत, ते धुवून शिवलिंगाला अर्पण करावेत. तसेच तांदळाचा एक दाणाही तुटू नये हे ध्यानात ठेवावं.

Image Source: pexels

सिंह रास (Leo)

शंकराचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी, शिव परिवाराची यथायोग्य पूजा करावी. तसेच भोलेनाथला पांढरं चंदन आणि पांढरी फुलं अर्पण करावी.

Image Source: pexels

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला खीर अर्पण करावी.

Image Source: pexels

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा.

Image Source: pexels

वृश्चिक रास (Scorpio)

श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी शिव चालीसा पठण करून ॐ नमः शिवाय मंत्राचा जप 108 वेळा करावा.

Image Source: pexels

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करावा.

Image Source: pexels

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गो मातेची सेवा करावी.

Image Source: pexels

कुंभ रास (Aquarius)

शिवशंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शिवलिंगावर बेलपत्र, हिरवी मूग आणि भांग अर्पण करावी आणि 'श्री शिवाय नमस्तुभ्यम्' या मंत्राचा जप करावा.

Image Source: pexels

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांनी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करावा आणि शिव चालिसा पठण करावं.

Image Source: pexels