आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करावा.
आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा.
तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका. मानसिक शांतता राखा.
आज तुमच्या हाता-पायांना सूज येऊ शकते. त्यामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल.
वाढत्या उन्हाळ्यामुळे आज तुम्हाला थोडासा अशक्तपणा जाणवू शकतो. अशा वेळी थोड्या थोड्या वेळाने लिंबू सरबत किंवा ग्लूकोसचं पाणी प्या.
आज तुमचं मन एखाद्या विचारात फार अस्वस्थ असू शकतं. तुमच्या मनाला शांत करण्यासाठी धार्मिक ठिकाणाला भेट द्या.
दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना आणखी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, म्हणूनच तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडं सतर्क राहिलं पाहिजे.
आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल बेफिकीर न राहिल्यास बरं होईल. किरकोळ समस्या आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा खोकल्याची समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते, त्यामुळे अगदी क्षुल्लक समस्या असतानाही निष्काळजीपणा करू नका.
तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल.
आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.
तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.
( वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)