जर तुम्हालाही मुंगूस दिसत असेल तर तो तुमच्यासाठी शुभ संकेत आहे.
जर मुंगूस सकाळी दिसला तर तुमचा दिवस अगदी छान जाण्याचा हा संकेत आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, मुंगूसला सूर्याचं प्रतीक मानलं जातं.
मुंगूस तुमचं आयुष्य सूर्यासारखं तेजस्वी बनवतो.
जर तुम्हाला मुंगूस दिसत असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे.
हिंदू धर्म ग्रंथानुसार, मुंगूसला धन-संपत्तीचा कारक देवता भगवान कुबेराचं वाहन मानण्यात आलं आहे.
जर तुम्ही कुठे जात असताना रस्त्यात मुंगूस दिसला तर याचा अर्थ ज्या कामासाठी तुम्ही जात आहात ते काम शुभकारक होणार आहे.
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, मुंगूसाचं दर्शन होणं म्हणजे भगवान कुबेराचं दर्श करण्यासारखं आहे.
मुंगूसला गुप्त धनाचं प्रतीक मानण्यात आलं आहे.
मुंगूसाचं दिसणं सौभाग्याचा संकेत आहे.