घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर व्हावा, सुख-शांती नांदावी यासाठी घरात देव-देवतांचे फोटो लावले जातात.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

वास्तूशास्त्रानुसार, भगवान हनुमानाचा फोटो तुमच्या बेडरूममध्ये चुकूनही लावू नका.

भगवान हनुमान बाल ब्रम्हचारी होते त्यामुळेच त्यांचा फोटो बेडरूममध्ये लावणं फार अशुभ मानलं जातं.

असं केल्याने, अनेक संकटांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते.

घरात उडणाऱ्या स्वरूपात असलेल्या हनुमानाचा फोटो लावल्याने व्यक्तीच्या जीवनात त्यांच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात.

जीवनात विश्वास, साहस आणि बळ हवं असेल तर हनुमानाचा पर्वत उचलतानाचा फोटो लावा.

वास्तूशास्त्रानुसार, घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो लावणं फार शुभ मानलं जातं.

घरात भगवान हनुमानाचा फोटो दक्षिण दिशेने लावणं शुभ मानलं जातं.

हनुमानाचं स्वरूप बैठ्या स्वरूपात असावं. असं केल्याने नकारात्मक शक्तीचा प्रभाव राहत नाही.

वास्तूच्या नियमांनुसार, हनुमानाच्या फोटोच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)