श्रावण महिन्यात साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

श्रावण सुरू झाला की पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते.

Image Source: pexels

नागपंचमीच्या दिवशी नागाच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा केली जाते.

Image Source: pexels

नागपंचमी 2024 पूजा मुहूर्त

यंदा नाग पूजेसाठी शुभ मुहूर्त 9 ऑगस्टला (आज) सकाळी 12.36 वाजता सुरु होईल आणि 10 ऑगस्ट रोजी पहाटे 3.14 वाजता संपेल.

Image Source: pexels

हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे.

Image Source: pexels

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो.

Image Source: pexels

नागपंचमीच्या दिवशी सुख, समृद्धी आणि पिकांच्या रक्षणासाठी शेतात नागांची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं.

Image Source: pexels

नाग हा शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूचा पलंगदेखील आहे.

Image Source: pexels

या दिवशी नागांची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं.

Image Source: pexels

नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नाग देवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःखं दूर होतात.

Image Source: pexels