तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आज तुमचा रक्तदाब वाढू शकतो, त्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
तुमचं आरोग्य चांगलं राहील. जर तुम्हाला तुमची तब्येत बिघडल्याचं जाणवत असेल तर लवकरच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुम्हाला लवकरच आराम मिळू शकेल.
आज तुमचं आरोग्य काहीसं कमजोर असेल. आज ज्येष्ठांना सांधेदुखीचा त्रास होईल, रोज तेलाने मसाज करत राहिल्यास आराम मिळेल.
आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वातावरण बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लाईट आहारच घ्या.
जर तुम्ही यात्रा करण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्रवास सुखाचा होईल. फक्त मनात भीती ठेवू नका.
आज तुमची तब्येत सामान्य असणार आहे. तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. फक्त तुमची औषधं वेळेवर घ्या.
जर तुम्ही खूप दिवसांपासून मानसिक तणावातून जात असाल तर आज हा ताण कमी होऊ शकतो.
तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु बाहेरील कोणत्याही प्रकारचं अन्न खाणं टाळावं, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते.
तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं.
तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तणावपूर्ण गोष्टींपासून दूर राहा, अन्यथा तुमची डोकेदुखी वाढू शकते.
आज मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणं सुटू शकतात, ज्यामुळे तुम्हाला खूप मानसिक शांती मिळेल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.
तुमचं आरोग्य नीट राखण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक केला पाहिजे, ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आणि शिळं अन्न खाणं टाळा.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत् आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )