यंदा रक्षाबंधन 19 ऑगस्ट 2024 रोजी आहे.
या दिवशी सोमवारी पौर्णिमा असून पहाटे 03.04 वाजता सुरु होणार आहे. तर हा मुहूर्त रात्री 11.55 वाजता समाप्त होईल.
यावर्षी सुद्धा भद्राकाळच्या सावटाखाली रक्षाबंधनाचा सण असणार आहे.
याची वेळ सोमवारी सकाळी 5.53 पासून सुरु होऊन दुपारी 1.32 पर्यंत असणार आहे.
या काळात भावाला राखी बांधणे अशुभ असते. त्यामुळे भद्राकाळात चुकूनही राखी बांधू नका.
शुभ मुहूर्त दुपारी 1.32 पासून संध्याकाळी 04 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे.
पौराणिक मान्यतेनुसार, भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे.
लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती.
भद्राकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते.
दुसर्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे.
असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकालात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही.
रक्षाबंधनाचा सण भद्राकाळ वगळता शुभ काळात साजरा करावा असे शास्त्रात सांगितले आहे.