ज्योतिष शास्त्रानुसार, देवों के देव महादेव म्हणजेच भगवान शंकराची पूजा, भक्ती अनेक प्रकारे केली जाते.
प्राचीन काळापासून आध्यात्मिक भक्त आणि भाविकांकडून शिव भक्तीसाठी एक मुखी रुद्राक्षाची पूजा केली जाते.
या एक मुखी रुद्राक्षाला भगवान शंकराचं स्वरुप मानलं जातं.
रुद्राक्ष कधीही काळ्या रंगाच्या धाग्यात वापरु नये.
हे धारण केल्यानंतर, तामसिक भोजन करु नये.
एक मुखी रुद्राक्ष धारण करण्याआधी रुद्राक्ष मंत्राचा जप करणं गरजेचं आहे.
जर रुद्राक्षाचा धागा खराब झाला असेल तर तो लगेच बदला. हे धारण केल्यानंतर अशुद्ध स्थानी जाऊ नका.
एक मुखी रुद्राक्ष घातल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात.
एक मुखी रुद्राक्ष योग आणि ध्यान करताना लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतात.
हे तुमचं हृदय, रक्ताभिसरण आणि डोळ्यांच्या दृष्टीसाठी फार चांगलं मानलं जातं.