पाकिटात आपण पैसे सोडल्यास इतर अनेक गोष्टीदेखील ठेवतो पण तुम्हाला माहीत आहे का की अशा चार गोष्टी आहेत ज्या पाकिटात ठेवणं चुकीचं आहे.
जर तुम्ही असं केलं तर देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. तसेच, आर्थिक तंगी सुरु होऊ शकते.
या 4 गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वास्तू शास्त्रानुसार, चुकूनही पाकिटात पूर्वजांचा फोटो ठेवू नका.तसेच, देवी-दैवतांचा फोटोदेखील खिशात ठेवणं फार अशुभ मानलं जातं.
यामुळे तुमच्या घरात पैशांची आवक कमी होऊ लागते. आणि कुटुंबावर संकट ओढावण्याची शक्यता असते.
नोटांना आणि नाण्यांना देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. अशातच जर नोटांना जर तुम्ही वाईट अवस्थेत पर्समध्ये ठेवत असाल तर तो एक प्रकारे पैशांचा अपमानच आहे.
पाकिटात चुकूनही नेल कटर, चावी, चाकू, पिन किंवा अन्य कोणत्याही वस्तू ठेवू नका. असं केल्याने घरात वास्तू दोष होऊ शकतो.
यामुळे कुटुंबातील लोकांना साथीचे रोग होण्याची शक्यता असते. आणि तुमचा बराचसा पैसा वाया जाण्याची शक्यता असते.
वास्तू शास्त्रानुसार, तुमच्या पाकिटाला कोणत्याही परिस्थितीत रिकामी ठेवू नका,वास्तू शास्त्रानुसार, असं केल्याने फार अशुभ परिणाम मिळतात.
( वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)