ज्योतिषशास्त्रानुसार, या जन्मतारखेची मुलं वयाने कितीही वाढली तरी यांची वागणूक बालिश असते. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 वर बुध ग्रहाचं राज्य आहे. या क्रमांकाचा ग्रह बुध आहे. ही मुलं कधीच सिरीयस मूडमध्ये नसतात, त्यांना प्रत्येक गोष्ट दहा वेळा समजावून सांगावी लागते. या मुलांचं मन मात्र निर्मळ असतं, ते कधीही कुणाविषयी वाईट चिंतत नाहीत. यांच्या तोंडाचा पट्टा कायम सुरू असतो. सतत बडबड करण्याची त्यांना सवय असते. मूलांक 5 ची मुलं कधीच कसलं टेन्शन घेत नाही. ते एकदम बिनधास्त राहतात. कधीच मनात काही ठेवत नाहीत. जे आहे ते तोंडावर सहजपणे बोलून टाकतात. ही मुलं पत्नी आणि घरच्यांसाठी भाग्यवान समजले जातात. त्यांच्या जोडीदाराला पावलोपावली साथ देतात आणि प्रत्येक कामात मदत करतात.