नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि या दरम्यान कन्या पूजन देखील महत्त्वाचा विधी मानला जातो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: facebook

नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते. धार्मिक शास्त्रांनुसार नवरात्र, कन्या पूजनशिवाय अपूर्ण मानली जाते.

Image Source: facebook

मुलींना देवीचे रूप मानून कन्यापूजन केले जाते, परंतु या दरम्यान काही चुका झाल्या तर त्याचे फळ प्राप्त होत नाही.

Image Source: facebook

म्हणून, कन्यापूजन करताना काही नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.

Image Source: facebook

पूजनाची जागा

जिथे कन्या पूजन करायचे आहे ती जागा पूर्णतः स्वच्छ आणि शुद्ध पाहिजे.

Image Source: facebook

वागणूक

कन्यांना देवीचे रूप मानले जाते म्हणून त्यांच्याशी आदराने, प्रेमाने व नम्रतेने वागा. कन्या पूजन करताना राग, अहंकार किंवा नकारात्मक विचार मनात ठेवू नका.

Image Source: facebook

अशुद्ध अन्न

कन्या पूजनासाठी नेहमी सात्विक अन्न तयार करावं. शिळं अन्न कन्यांना देणं अशुद्ध मानलं जातं.

Image Source: facebook

कन्यांची संख्या

मान्यतेनुसार 2, 5, 7 किंवा 9 कन्यांचे पूजन शुभ मानले जाते. 1, 3, 6 किंवा 8 कन्यांचे पूजन टाळावे.

Image Source: facebook

कन्यांना रिकाम्या हाताने निरोप देऊ नये

कन्या पूजनानंतर त्यांना आपल्या सामर्थ्यानुसार काहीतरी भेटवस्तू किंवा दक्षिणा द्यावी.

Image Source: facebook

स्नान

स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि नंतर येणाऱ्या कन्यांचेही हात पाय धुवून त्यांचे स्वागत करा.

Image Source: X

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: facebook