श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक सण येतात. यंदा कृष्ण जन्माष्टमी 26 ऑगस्ट रोजी आली असून 27 ऑगस्टला दही हंडीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान कृष्णाची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. वास्तुशास्त्रामध्ये श्रीकृष्णाशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते. वास्तूमध्ये मोराच्या पिसाला सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरात मोराची पिसे आणल्याने सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच, शिवाय घरातील वास्तुदोषही दूर होतात. घरामध्ये मोराची पिसे ठेवणे खूप शुभ मानले जाते. वास्तूनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोराची पिसे लावल्याने ते घर खराब होत नाही. त्याच्या प्रभावामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते.