यंदा जन्माष्टमीचा उत्सव उद्या म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. तसेच, भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. श्रीकृष्णाचं दर्शन करताना त्यांना मोरपंख चढवा. या दिवशी भगवान श्री कृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. तसेच, श्रीकृष्णाला श्रृंगार अर्पण करा. संपूर्ण दिवस भगवान श्री कृष्णाची पूजा, आराधना करा. तसेच, मधल्या वेळेत ‘कृं कृष्णाय नम:’ असा भगवान श्री कृष्णाच्या नामाचा जप करा. रात्री 12 वाजता पूजेच्या आधी पुन्हा स्नान करा. दक्षिणावर्ती शंखाने भगवान कृष्णला पंचामृताने अभिषेक करा. भगवान श्री कृष्णाची परिवारासह आरती करा. देवाला प्रसाद चढवून सर्वांना प्रसाद द्या.