जन्माष्टमीचा पवित्र सण श्रीकृष्णाच्या जन्मदिनी साजरा केला जातो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

हा सण मथुरा आणि वृंदावनसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

Image Source: pexels

जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर विधीवत पूजा करतात.

Image Source: pexels

पौराणिक कथेनुसार, द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला.

Image Source: pexels

जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात या संदर्भात अनेकांचा संभ्रम असतो.

Image Source: pexels

तुळशीला स्पर्श करू नका -

जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी तुळशीची पूजा केली असल्यास लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका.

Image Source: pexels

मोकळे केस सोडू नका -

तुळशीची पूजा करताना किंवा कोणत्या देवी-दैवतांची पूजा करताना महिलांनी केस कधीही मोकळे सोडू नका.

Image Source: pexels

तुळशीची पाने ओरबाडून तोडू नका -

भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करायची असतील तर ती ओरबडून तोडू नयेत.

Image Source: pexels

परिक्रमा -

तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करण्यास विसरू नका.

Image Source: pexels

तुळशीचे वस्त्र बदला -

तुळशीला नवीन वस्त्र अर्पण करण्यासाठी जन्माष्टमी हा खूप शुभ दिवस मानला जातो.

Image Source: pexels