असं म्हणतात की एखाद्याशी आपलं दु:ख शेअर केल्याने आपलं दु:ख कमी होतं. आणि एखाद्याशी आपला आनंद शेअर केल्याने आपल्या आनंदात भर पडते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

पण,आचार्य चाणक्यांच्या मते, आपल्या आयुष्यात असे काही दु:ख आहेत जी कधीच कोणाबरोबरच शेअर करु नयेत.

Image Source: pexels

असं म्हणतात की, काही लोकांबरोबर दु:ख शेअर केल्याने आपली संकटं आणि अडचणी दुप्पट पटीने वाढतात.

Image Source: pexels

जे सर्वांचेच मित्र असतात

जे लोक प्रत्येकाला आपला मित्र मानतात अशा लोकांबरोबर कधीच आपलं दु:ख शेअर करु नका. असे लोक वेळ आल्यावर तुमचं दु:ख इतरांशी शेअर करु शकतात.

Image Source: pexels

प्रत्येक गोष्टीची चेष्टा करणारे लोक

जे तुमच्या म्हणणं ऐकून घेत नसतील, सतत चेष्टा करत असतील अशा लोकांवर चुकूनही विश्वास ठेवू नका.

Image Source: pexels

स्वार्थी लोक

कधीही स्वार्थी लोकांबरोबर आपलं दु:ख शेअर करु नका. अशा लोकांना दुसऱ्यांना दु:ख द्यायला आवडतं.

Image Source: pexels

इतरांवर रागावणारे लोक

जे लोक इतरांवर जळतात किंवा चिडतात अशा लोकांना आपलं दु:ख कधीच शेअर करु नये.

Image Source: pexels

असे लोक वेळ आल्यावर आपलं वर्तन बदलतात. तसेच, इतरांसमोर आपल्या म्हणण्याची चेष्टा करतात.

Image Source: pexels

विचार न करता बोलणारे लोक

खूप बोलके असणारे लोक कधीही काहीही बोलून मोकळे होतात. आणि नंतर त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप होतो.

Image Source: pexels

यासाठीच कधीही विचार न करता कोणाशीही आपलं म्हणणं शेअर करु नका. कारण हे लोक कोणासमोरही तुमची गोष्ट शेअर करु शकतात.

Image Source: pexels

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)