श्रीकृष्णाला तुळशी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण केली जाते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: google/Budsnblush

जन्माष्टमीला श्रीकृष्णाला तुळशी अर्पण करण्यासोबतच पुढील उपायही अवश्य करा. यामुळे तुम्हाला संकटापासून मुक्ती मिळेल .

Image Source: google/pinterest

द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला.

Image Source: google/peakpx

त्यामुळे या दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर विधीवत पूजा करतात.

Image Source: google/Shutterstock

भगवान विष्णूंना तुळशीवर खूप प्रेम आहे. भगवान विष्णूचा अवतार असल्याने भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करण्याची परंपरा आहे.

Image Source: google/greenparadicelive

जन्माष्टमीच्या दिवशी भोगामध्ये लोणी, साखर, धणे, पंजिरी किंवा तुळस घालून भगवान श्रीकृष्णाला अर्पण करा. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते.

Image Source: pixabay

जन्माष्टमीच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून तुळशीला प्रदक्षिणा घालावी. या उपायाचे पालन केल्याने जीवनात सुख-समृद्धी वाढते.

Image Source: pixabay

काही कारणास्तव लग्नाला उशीर होत असेल किंवा लग्न पुन्हा पुन्हा तुटत असेल तर अशा मुलींनी जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरी तुळशीचे रोप लावून त्याची नित्य पूजा करावी.

Image Source: google/bloom hub

जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीसमोर बसून भगवान श्रीकृष्णाच्या चार नावांचा जप करा - गोपाल, देवकीनंदन, गोविंदा आणि दामोदर. या नावांना भगवान श्रीकृष्णाचे मूळ मंत्र म्हटले गेले आहे.

Image Source: pixabay

टीप

( वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)