वैदिक पंचांगानुसार, आज 8 ऑगस्ट 2025 चा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

आज जोडीदाराच्या कला कलाने घ्यावे लागेल, नोकरी व्यवसायात बौद्धिक पातळीवर अनेक प्रश्न सोडवाल.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

आज तुमच्या विनयशील मनमिळाऊ स्वभावामुळे आतापर्यंत बरीच पडलेली कामे मार्गी लावाल.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

आज ज्या ठिकाणी काम करता तेथे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागेल, खूप काम करूनही नोकरीमध्ये वरिष्ठांची मनमानी सहन करावी लागेल.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

आज डोके शांत ठेवण्याव्यतिरिक्त तुमच्या हातात काही राहणार नाही, व्यवसायात बारकाईने सर्व गोष्टींचे निरीक्षण करून निर्णय घ्या.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

आज तुमच्यातील कलाकार लोकांना जाणवेल, घरामध्ये बुद्धी आणि व्यवहार यांची सांगड योग्य तऱ्हेने घालावी लागेल.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

आज विद्यार्थ्यांनी इतर ठिकाणी जास्त लक्ष न देता, अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे महिला योग्य विचार करून पावले टाकतील.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

आज सुसंधीचे सोनेरी क्षण वेचायला तुमची बुद्धी सक्षम असल्यामुळे, तुम्ही कशाचीच पर्वा करणार नाही.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

आज कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरेल.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

आज कोर्टकचेरीबाबत चालणारे खटले थोडेसे त्रास देतील, कुटुंबातील व्यक्तींच्या वागण्यामुळे थोडा मनस्ताप संभवतो.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो पूर्वीच्या गोष्टी करण्याचे तुम्ही टाळत होतात, त्याच गोष्टी करण्याकडे तुम्ही पुन्हा उत्सुक व्हाल.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

आज तुमच्या एकंदरीत स्वभावामुळे ज्या गोष्टीमुळे लाभ मिळतं ती गोष्ट तुम्ही करालच, पण काम करण्यासाठी पडलेले कष्ट तुम्ही चिकाटीने पेलाल.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

आज तुमच्या बुद्धीला शांत विचारीपणाची झालर असेल, व्यापारात नफा मिळण्यासाठी हे धोरण उत्तम उपयोगी पडेल.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA