वैदिक पंचांगानुसार, आज 6 ऑगस्ट 2025 कोणासाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

आज प्रत्येक वेळेस समय सूचकता दाखवाल, तुमच्या हजरजबाबी व्यक्तिमत्त्वामुळे वरिष्ठांची मने जिंकून घ्याल.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

आज स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे हिताचे ठरेल.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

आज समोरच्या माणसातील गुण हेरून त्याचे कौतुक करणे फायद्याचे ठरेल.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनो हट्टी आणि दुराग्रहीपणा सोडावा लागेल, कोणताही गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

आज महिलांनी मानसिक ताण जास्त घेऊ नये, समोरच्या माणसाला नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कळणार आहे.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

आज व्यवहारात कोणाशी संगनमत करायचे, हे ठरवून आपल्या फायद्याच्या गोष्टी ओळखाल.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

आज करिअरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील, परंतु द्विधा मनस्थितीमध्ये बराच काळ न घालवता या संधीचे सोने करा.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

आज नवीन ऑर्डर्स हातात मिळतील, त्या दृष्टीने पावले टाकावी लागतील.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

आज एखाद्या कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल, कामे पूर्ण करण्याच्या हिशोबाने दुसऱ्यावर विसंबून राहू नका.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो वैवाहिक जीवनात पेल्यातील वादळे उठतील, शांततेचे धोरण ठेवा.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

आज महिलांना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा ऐकावे लागेल, तुमच्या बुद्धीची कदर करणारे आणि तुमची भावनिक पातळी जपणाऱ्या सहकार्यांशी तुमचं चांगले जमेल.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

आज मित्रांशी गाठीभेटी होतील, घरामध्ये थोडे तणावाचे प्रसंग आले तरी कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA