वैदिक पंचांगानुसार, आज 4 ऑगस्ट 2025 चा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

आज कलाकारांच्या कलेला उत्तेजन मिळेल, कमी कष्टात आर्थिक लाभ होतील.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

आज थोडी खर्च कृती राहिल्यामुळे हातात पैसा राहणार नाही, काही महत्त्वाचे निर्णय विचार करून घेतले जाण्याची शक्यता.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

आज तुमच्या हट्टी आणि लहरी स्वभावाचा जवळच्या लोकांना त्रास होईल, थोड्या कारणाने आजारी पडण्याची शक्यता.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनो महिला कोणाच्या तंत्राने चालणार नाहीत. घाईने निर्णय घेतलेत तर प्रगती खुंटण्याची शक्यता.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

आज परदेश जाण्याची इच्छा असणाऱ्यांना संधी येतील, उच्च शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

आज अध्यात्मिक जीवनाची आवड असणारे ध्यान उपासनेत राहून जातील, घरामध्ये धार्मिक आणि मंगल कार्य घडतील.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

आज सामाजिक काम करणाऱ्यांना भरपूर सहकार्य मिळाल्यामुळे, हातून चांगले कार्य होईल. महिला प्रभुत्व गाजवतील.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

आज चांगली बुद्धिमत्ता असूनही तिचा योग्य वापर न केल्यामुळे कामे रखडतील.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

आज पैसा आला तरी खर्चाला मर्यादा राहणार नाही, छोटे-मोठे प्रवासाचे योग येतील.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो कुटुंब आणि मित्रांसमवेत सहलीला जाण्याचे बेत ठरवाल, अचानक एखादे जुने येणे वसूल होण्याची शक्यता.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही प्रगतीपत चालू राहणार आहे, एखाद्या दुर्मिळ संधीबद्दल उगीचच अलिप्तपणा दाखवाल.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

आज जास्त ताण वाढवून घेण्याचे कारण नाही, त्यामुळे एखाद्या गोष्टीचा दिलखुलासपणे आस्वाद घ्या.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA