आज आर्थिक बाजू लगेच सुधारेल असे नाही परंतु त्या दृष्टीने पावले टाकले जातील.
आज कामासाठी जरा जास्त कष्ट घ्यावे लागतील. व्यवसाय धंद्यात प्रतिष्ठित व्यक्तींचे तंत्र सांभाळून काम करावे लागेल.
कामाच्या तंत्रात सुधारणा केल्याशिवाय यश दृष्टीक्षेपात येणार नाही.
तुमच्यात आकलन शक्ती उत्तम असल्यामुळे तुमच्या कामात तुम्ही यशस्वी होणार आहात.
महिलांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या धोरणाने काम करावे. तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टींमध्ये कामे पटकन होतील.
कोणते व्यसन असेल तर ते काबूत ठेवण्याचा प्रयत्न करा नाहीतर नसत्या चिंता करण्याची वेळ येऊ शकते.
नोकरी व्यवसायात हाताखालचे लोक फसवण्याची शक्यता आहे तेथे सावधानता बाळगा.
पैशांच्या व्यवहारात तुमचे गणित आज चुकण्याची शक्यता आहे म्हणून महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
घरामध्ये एखाद्या व्यक्तीचे प्रकृती अस्वस्थ वस्तूंची दुरुस्ती किंवा पाहुणचार या कारणाने पैसे खर्च होतील.
महिलांनी अति विचार करू नये. काम करताना स्वतंत्र वृत्ती राहील.
नोकरीमध्ये दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे आज तुम्हाला मानवणार नाही.
वैवाहिक जीवनात मनाविरुद्ध तडजोड करावी लागेल.