आज तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये धोरणी आणि व्यवहारिकपणा ठेवायला लागेल.
इतरांशी जुळवून घेण्यातच तुमचा स्वार्थ आहे त्यात कमीपणा न मानता त्यांच्याकडून काम करून घ्या.
महिलांनी आज तटस्थ भूमिका ठेवणे चांगले. आज कोणत्याही ऐहिक सुखाची अपेक्षा करू नका.
जरुरीपेक्षा जास्त स्वतंत्र वृत्तीमुळे लोकांशी तुमचे फार काळ जमू शकणार नाही.
तुमच्या चंचल स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागेल. तुमच्याच मताला चिकटून राहाल.
आज लोकांचे विचार तुम्हाला पटणार नाहीत. आत्मविश्वास वाढवण्यासाठी थोडी ध्यानधारणा करावी लागेल.
व्यवसाय स्पर्धा तीव्र झाल्यामुळे गिऱ्हाईकाला आकर्षित करण्यासाठी तुम्हाला इतर सुविधा पुरवावे लागतील.
खर्च खूप होणार आहेत. महिला कला जोपासतील.
नोकरीमध्ये नवीन पद्धतीच्या प्रशिक्षणाकरिता तुमची निवड होण्याची शक्यता आहे.
व्यवसायात नफ्याचे प्रमाण कमी होईल कोणत्याही नियोजनामध्ये थोडे कमी पडाल.
घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा राहणार आहेत त्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
नोकरी व्यवसायात आत्तापर्यंत जे अडथळे आले होते ते पार करण्याचे धाडस तुम्हाला मिळेल.