आज थोडी धडधड वृत्ती ठेवल्यामुळे अपेक्षेइतके यश मिळणार नाही.
विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. व्यवसायात कामाची खूप धांदल उडेल.
आज कामामुळे थोडा थकवा जाणवेल. आरामात दोन-चार दिवस घालवावे असा मोह होईल.
आज अजिबात स्वस्त बसवणार नाही. तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये धोरणी आणि व्यवहारीपणा दिसेल.
पारंपरिक विचारांना झुगारून दिल्यामुळे जवळच्या माणसांना तुम्ही विक्षिप्त वाटण्याची शक्यता आहे.
संतती संबंधी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
महिला पुढील काल्पनिक गोष्टींची उगीच चिंता करतील.
एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची आवड राहील.
आज कोणतेही काम करताना एक ना धड भाराभार चिंध्या अशी अवस्था होऊ नये याची काळजी घ्या.
कुटुंबामध्ये कोणताही निर्णय घेताना सारासार विचार ठेवणे आवश्यक राहील.
राजकारणातील व्यक्तींना आपली मते समाजात रुजवण्याच्या वेगवेगळ्या संधी येतील.
आज म्हणावे असे यश पदरात पडणार नाही. महिलांनी तटस्थ भूमिका ठेवणे चांगले राहील.